दिपकआबांच्या पाठीशी तन मन आणि धनाने खंबीरपणे उभा राहणार
कोलकत्यात गलाई बांधवांचा एकमुखी निर्धार पश्चिम बंगालमध्ये दिपकआबांचे अभूतपूर्व स्वागत
सांगोला ; तालुका प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा सांगोला तालुक्यातील गावभेट आणि जनसंवाद दौरा प्रचंड सुपरहीट ठरत असताना राज्याच्या बाहेरही दिपकआबांच्या लोकप्रियतेची झलक पाहायला मिळाली.
पश्चिम बंगाल मधील कोलकत्ता दौऱ्यावर असलेल्या दिपकआबांचे कोलकत्ता विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. करून यंदा कोणत्याही परिस्थितीत दिपकआबांच्या पाठीशी सांगोला तालुक्यातील देशभर पसरलेले सर्व गलाई बांधव तन, मन आणि धनाने दिपकआबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतील असा विश्वासही यावेळी गलाई बांधवांनी व्यक्त केला. रविवार दि २१ रोजी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील कोलकत्ता दौऱ्यावर गेले होते. यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे महाराष्ट्रातील तमाम मराठी गलाई बांधवांनी भव्यदिव्य स्वागत केले. त्यानंतर हजारो गलाई बांधवांसमवेत दिपकआबांनी कोलकत्ता येथील सुप्रसिद्ध कालीमाता यांचे दर्शन घेऊन कोलकत्ता येथील अग्रेसन सेवा समिती हॉलमध्ये तमाम मराठी गलाई बांधवांशी संवाद साधला. यावेळी मराठी गलाई बांधवांनी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा हृद्य सत्कार करून दिपकआबाचा सन्मान केला. यावेळी आसाम राज्य गलाई संघटनेचे अध्यक्ष सुभाषशेठ बाबर तसेच पश्चिम बंगाल गलाई संघटनेचे अध्यक्ष अनिलभैय्या शिंदे यांच्यासह सुप्रसिद्ध उद्योजक संजयशेठ दिघे, रामदाजी चव्हाण, उत्तमरावजी जरे, महादेव जरे, दत्तात्रय बुलबुले विनोद पवार आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आसाम आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यातील हजारो मराठी गलाई बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गलाई बांधवांनी आपल्या अनेक वर्ष प्रलंबित असणाऱ्या मागण्यांचे निवेदन माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांना दिले. गलाई बांधवांना संबोधित करताना दिपकआबा म्हणाले, ज्या पद्धतीने सांगोल्याच्या डाळिंबाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली ओळख निर्माण करून सांगोल्याचे नाव जगाच्या नकाशावर उज्वल केले, त्याच पद्धतीने सांगोला तालुक्यातील गलाई बांधवांनी देशभर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवून सांगोला तालुक्याची देशाच्या नकाशात ठळक ओळख ओळख निर्माण केली. राज्याच्या बाहेर आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणाऱ्या बांधवांचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. देशभरात पसरलेल्या सर्व गलाई बांधवांच्या वर्षानुवर्ष प्रलंबित असणाऱ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. देशभरातील गलाई उद्योगाचा लघुउद्योग मध्ये समाविष्ट करण्यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करू तसेच राज्याच्या बाहेर चोरीचे सोने घेतले असा बनाव करून अनेक गलाई बांधवांना बाहेरील पोलिसांकडून नाहक त्रास दिला जातो यावरही तात्काळ उपाय योजना केल्या जातील आणि गलाई बांधवांसाठी प्रत्येक राज्यात स्वतंत्र महाराष्ट्र भवन उभा करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे अभिवचनही शेवटी दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिले.
चौकट ; दिपकआबांची गलाई बांधवांना ग्वाही…!
संपूर्ण देशभर विस्तारलेल्या गलाई बांधवांच्या प्रमुख मागण्या सोडविण्यासाठी आपण प्राधान्यक्रमाने प्रयत्न करणार आहोत. गलाई व्यवसायाचा सूक्ष्म व लघु उद्योगात समावेश करणे तसेच पोलिसांच्या नाहक त्रासापासून गलाई बांधवांचे संरक्षण करणे आणि प्रत्येक राज्यात प्रामुख्याने आसाम आणि पश्चिम बंगाल महाराष्ट्र भवन उभा करण्याची मागणी गलाई बांधवांनी केली यावेळी गलाई बांधवांच्या खांद्याला खांदा लावून हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिपकआबांनी दिली.
More Stories
नवसारी कृषी विद्यापीठातील शेतकरी मेळाव्यात मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना खास सहभाग
आमदार अभिजीत पाटील मित्रपरिवार व माढा शहर व तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन
पंढरपूर येथे गीरगाय, कुक्कूट व शेळीपालन उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम