नियमांचे पालन करुन गणेशत्सोव आनंदात व उत्साहात साजरा करावा- उपविभागीय पोलीस अधिकारी- अर्जुन भोसले
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर शहर व तालुक्यात सर्वच समाजाचे सण, उत्सव एकत्र येऊन आनंदाने साजरे करतात व जातीय सलोखा अबाधित ठेवतात अशी या तालुक्याची परंपरा आहे. आणि हीच परंपरा कायम ठेवून तसेच नियमांचे पालन करु गणेशोत्सव आनंदात व उत्साहात करावा, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांनी केले.
पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील गणेशोत्सव मंडळाची बैठक घेण्यात आली या बैठकीस पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी भोसले म्हणाले, गणेशोत्सव काळात शांततेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी.कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. पारंपरिक वाद्य व कमी आवाजाची साऊंड सिस्टिम याला मंडळांनी प्राधान्य द्यावे. गणेश मंडळांचा मंडप व विसर्जन मिरवणुकीतील देखावा हा रहदारीस अडथळा करणारा नसावा, ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची मर्यादा पाळावी, तसेच गणेशोत्सवामध्ये गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक उपक्रम राबवावेत. समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे सादरीकरण करावे. उत्सव काळात अनुचित प्रकार टाळण्यासाठी मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत. उत्सव साजरा करताना त्यामध्ये अडचणी निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके म्हणाले,मागील वर्षीप्रमाणे यंदाही शांततेत व चांगल्या वातावरणात उत्सव साजरे करा.समाज माध्यमातून जे आक्षेपार्ह संदेश पाठविण्यात येतात, ते इतरत्र पाठवू नये.आक्षेपार्ह संदेश असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला त्याची माहिती दयावी म्हणजे संबंधितावर कारवाई करता येईल.पोलिसांच्या सोशल मीडिया सेलच्या माध्यमातून आक्षेपार्ह सोशल मीडियाच्या पोस्टवर लक्ष ठेवण्यात येत आहे.महीलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासन तत्पर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
More Stories
नवसारी कृषी विद्यापीठातील शेतकरी मेळाव्यात मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना खास सहभाग
आमदार अभिजीत पाटील मित्रपरिवार व माढा शहर व तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन
पंढरपूर येथे गीरगाय, कुक्कूट व शेळीपालन उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम