24/10/2025

महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बंडू पवार उपाध्यक्षपदी सत्यवान जाधव, समाधान माने.

महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बंडू पवार उपाध्यक्षपदी सत्यवान जाधव, समाधान माने.

पंढरपूर प्रतिनिधी,

पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बंडू पवार यांची तर उपाध्यक्ष पदी सत्यवान जाधव आणि समाधान माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली.खेडभोसे ग्रामपंचायतीची ग्रामसभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुरेखा देवळे होत्या. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक श्री. गायकवाड उपस्थित होते.यावेळी मागील आठ वर्षांपासून रखडलेली तंटामुक्त समितीची नवी कार्यकारिणी निवडण्यात आली.

यात अध्यक्षपदासाठी बंडू दिगांबर पवार यांची तर उपाध्यक्ष पदी सत्यवान जाधव आणि समाधान भीमराव माने यांची एकमताने निवड करण्यात आली.यावेळी माजी सरपंच, उपसरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, संचालक, दूध संस्थेचे चेअरमन, पोलीस पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .सोबत फोटो: खेडभोसे गावच्या तंटामुक्त समितीचे नूतन अध्यक्ष बंडू पवार, उपाध्यक्ष सत्यवान जाधव, समाधान माने.

You may have missed