23/12/2024

सावडी मॅरेथॉन ची विजेती ठरली स्नेहा पाखरे.

सावडी मॅरेथॉन ची विजेती ठरली स्नेहा पाखरे_______

करमाळा प्रतिनिधी

सावडी येथे हिराभारती महाराज अखंड हरिनाम सप्ताह निमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटक_शैक्षणिक क्षेत्रातील कोहिणुर हिरा म्हणून ज्यांच्याकडे आदराने बघीतले जाते ते गणेश भाऊ करे_पाटील यांनी मॅरेथॉन स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली….

विशेषता शालेय विद्यार्थ्यांना विद्यार्थीनींना कला गुणातुन वाव मिळावा यासाठी हि स्पर्धा सावडीचे च मॅरेथॉन धावपटु स्वप्नील जाधव व माऊली मचाले यांनी आयोजित केली होती.स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस_ सुर्यकांत काकडे, सौरभ शिंदे, यांनी प्रत्येकी ३ हजार रूपये. मुले आणि मुली या दोन गटासाठी दिले.

द्वितीय बक्षीस_ एकनाथ मांढरे व अक्षय जाधव यांनी दोन गटासाठी प्रत्येकी २ हजार रूपये दिले.तृतीय बक्षीस_ डॉ. माऊली शेळके व अजित जाधव यांच्याकडून प्रत्येक दोन्ही गटासाठी १,००० रूपये बक्षीस देण्यात आले.

मुली:

१) स्नेहा पाखरे (वाशिंबे)

२) सिद्धी यदवते (सावडी)

३) रुतुजा काकडे

मुले:

१) शुभम गोडसे (सावडी)

२) ओमराजे भोसले

३) गणेश लोंढे (चिलवडी)