कर्मयोगी विद्यानिकेतन मध्ये बालगोपाळांचा दहीहंडीचा जल्लोष.
पंढरपूर प्रतिनिधी,
पंढरपूर शहरातील प्रसिद्ध असलेल्या कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेत नेहमीच विद्यार्थ्यांच्य कला गुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात.
कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर मध्ये गोकुळाष्टमीनिमित्त शुक्रवारी प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या जल्लोषामध्ये दहीहंडी फोडून गोपाळकाल्याचा उत्सव संपन्न केला.यावेळी फक्त मुलांनीच नव्हे तर मुलींनी देखील दहीहंडी फोडण्यासाठी मनोरे रचून आपले कौशल्य दाखवून दिले.

या कार्यक्रमांमध्ये प्रशालेतर्फे सर्व विद्यार्थ्यांसाठी गोपाळकाला तयार करून गोवर्धन पर्वत पूजा प्रशालेच्या प्राचार्या सौ प्रियदर्शिनी सरदेसाई यांच्या हस्ते संपन्न झाली. या उत्साहाच्या वातावरणामध्ये लहान मुलांनी महाभारतामधील वेगवेगळ्या पोशाखामध्ये येऊन दहीहंडी कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्व विद्यार्थ्यांना गोपाळकाला वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

More Stories
आ.अभिजीत पाटलांनी विठ्ठलाच्या पादुका डोक्यावर घेत विठ्ठल संरक्षण दिन केला साजरा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरण गाळपाचा शुभारंभ
माजी आमदार कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण