23/12/2024

निरू भैय्या युथ फाऊंडेशनचे विविध मागण्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

निरू भैय्या युथ फाऊंडेशनचे विविध मागण्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन….


वाणी चिंचाळे – निरू भैय्या युथ फाऊंडेशन सांगोला चे संस्थापक अध्यक्ष मा. निरंजन बळीराम गडहिरे यांनी वाणी चिंचाळे गावात वारंवार होत असलेले अपघात लक्ष्यात घेता सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन दिले त्यामध्ये धोकादायक असणारे दोन वळणावरती आर्यन मोबाईल शॉपी समोरील वळण आणि गणपत पाटील दूध डेअरी समोरील वळणावरती बहिर्वक्र आरसा लावणे व त्याच ठिकाणी गतिरोधक करण्याची मागणी या निवेदना द्वारे केली आहे.

तरी संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरच सर्व मागण्या पूर्ण करून नागरिकांचा प्रवास सुखकर करण्याचे आश्वासन दिले ,त्यावेळी उपस्थित अध्यक्ष निरंजन गडहिरे,सुरज रणदिवे,भारद्वाज गडहिरे,शुभम कसबे, साई कसबे उपस्थित होते.